Saturday, February 6, 2016

किरणं

चांदण आज ह्रदयात
घर करून बसलय
चांदण्या आकाशीच्या
डोळ्यात सजवून बसलय

किरणांच वेड तरी किती
सूर्याला मुठीत पकडू बघतय
प्रकाशाच्या वाटा सरळ
त्यांना मनात वळवू बघतय

हातात सापडेना काही आता
डोळ्यात काय हो मावतय
ऊब ही त्या चैतन्याची
मन मिठीत जगू पाहतय

चांदण्याला कैद करू पाहतय
सा-या सा-या जगाचा
अंधार दूर करू पाहतय
प्रकाशाला साठवू पाहतय..
मन किरणात असच हरवून जातय...

क्षितिज

सांज आभाळी उदास आहे..
जीव कसा कासाविस आहे..
क्षितिज असे मन आज दुभंगे
धरणी जगे अन घनी मरण आहे....